मनोरंजन

बॅालिवूड अभिनेत्री काजल अग्रवालच्या घरी झालं छोट्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : बॅालिवूड अभिनेत्री काजल अग्रवालने नुकतीच आनंदाची बातमी दिली आहे. काजल आई बनली असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. काजल अग्रवालने मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांना सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

‘सिंघम’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणून काजल अग्रवालला ओळखले जाते. तिने २०२० मध्ये उद्योगपती गौतम किचलूशी लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी आता ते दोघेही आई-बाबा बनले आहेत. काजल आणि गौतमच्या घरी एक छोटा पाहुणा आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी याबाबत काहीही माहिती दिलेली नाही.

दरम्यान, ‘बॉलिवूड बबल’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, काजल अग्रवालने नुकतंच मुलाला जन्म दिला आहे. काजल आणि गौतमचे हे पहिलेच बाळ आहे. त्यामुळे ते दोघेही फार खूश आहेत. मात्र, या वृत्ताला काजल आणि गौतमकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये