ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच चित्रपट लीक

Adipurush Film Online Leak : 2023 वर्षाचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘आदिपुरुष’ (Adipurush) आज (16 जून) थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात प्रभासने (Prabhas) प्रभू श्री रामाची भूमिका साकारली आहे तर क्रिती सेनननं (Kriti Sanon) या चित्रपटात जानकी ही भूमिका साकारली होती. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. कारण ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच तो काही वेबसाइटवर ऑनलाइन लीक (Adipurush Online Leak) झाला आहे.

ओम राऊतनं (Om Raut) दिग्दर्शित केलेला ‘आदिपुरुष’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करेल, असं म्हटलं जात आहे. पण आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे. आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच लीक झाला आहे. ‘आदिपुरुष’ हा चित्रपट एचडी प्रिंटमध्ये पायरेटेड वेबसाइट्स तमिलरॉकर्स, फिल्मझिला, मूव्हीरुल्झ आणि अनेक ऑनलाइन पायरसी वेबसाइटवर ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट केवळ डाउनलोड करण्यासाठीही ऑनलाइन लीक झाला आहे.

‘आदिपुरुष’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या चित्रपाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही लोकांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटले आहे, तर काही लोक या चित्रपटातील वीएफएक्स खराब आहे, असं म्हणत आहेत. अशातच आता हा चित्रपट ऑनलाइन लीक झाल्याचा परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होईल का? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये