३२ वर्षाने दादा पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदावरुन पायउतार; अध्यक्ष दुर्गाडे यांची माहिती
पुणे : (Ajit Pawar resigns as director of Pune District Bank) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या ३२ वर्षांपासून जिल्हा बँकेचे संचालक होते. अजित पवार १९९१ पासून जिल्हा बँकेचे संचालक म्हणून काम पाहत होते. बँक राज्यात नंबर वनला आणण्याचे काम अजित पवारांनी काम केले. पण त्यांनी मंगळवारी अचानक जिल्हा बँकेचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. जिल्हा बँँकेच्या अध्यक्षांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अजित पवार जिल्हा बँकेच्या प्रत्येक पंचावार्षिक निवडणुकीत सहभागी व्हायचे. पण त्यांनी आता आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय.
बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनीदेखील याबाबत माहिती दिली. त्यांनी याबाबतचे पत्रक देखील काढले आहे. अजित पवारांनी संचालक पदाचा राजीनामा दिला असला तरी अजित पवार यांचे मार्गदर्शन घेऊ, असे बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी सांगितले आहे.