ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

सरपंच, सभापती कशाला राष्ट्रपतीही… अजित पवारांची सरकारच्या निर्णयावर टीका!

बारामती : (Ajit Pawat On State Government) राज्यातील दोघांच्या मंत्रिमंडळाला सध्या खूपच घाई झालेली दिसते. कोणतही विधेयक मंजूर न करता, एकाही आमदारांशी सविस्तर चर्चा न करता, अशा प्रकारचे निर्णय कसे घेतले जातात?. लोकशाहीच्या काही परंपरा आणि कायदे असतात. पण महाराष्ट्राचा सर्व कारभार दोनचं लोक चालवत आहेत. दोघांच्या कॅबिनेटमध्येच अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. अशी टिका विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारवर केली आहे.

संविधानाप्रमाणं बहुमतात असलेल्या पक्षातील खासदार पंतप्रधान ठरवतात. राज्यातही १४५ आमदारांचा पाठिंबा असलेल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होतो. याच पद्धतीवर नगराध्यक्ष, सरपंचांच्या निवडी होत होत्या. नगराध्यक्ष, सरपंच वेगळ्या विचारांचे असतील तर काय होते, याचा अनुभव आम्ही घेतला आहे. अधिकारांचे केंद्रीकरण लोकशाहीला घातक आहे, असं यावेळी पवार म्हणाले.

केवळ नगराध्यक्ष आणि सरपंचाचीच जनतेतून निवड कशाला, मुख्यमंत्री आणि राष्ट्रपतींची निवडही जनतेतून करा, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारावती येथे माध्यमांशी संवाद साधताना केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये