Top 5ताज्या बातम्यामनोरंजन

आलीया भट्टच्या आजोबांची प्रकृती चिंताजनक

Bollywood News : बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलीय भट्टचे (Alia Bhatt) लाखो चाहते आहेत. मागील काही वर्षांत तिने एकाचढ एक अनेक भन्नाट चित्रपट देऊन चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. मात्र, सध्या आलियाचे आजोबा नरेंद्र राजदान (Narendra Rajdan) यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल आहे. याबाबत माहिती मिळताच आलियाने आपला विदेश दौरा रद्द करून विमानतळावरून थेट रुग्णालय गाठलं. (Alia Bhatt Grand Father in critical condition)

एका वृत्तपत्राच्या माहितीनुसार सोनी राजदान (soni razdan) यांचे वडील नरेंद्र राजदान हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. ते ९५ वर्षांचे असून काही दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आलिया भट्ट सध्या तिच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’(Rocky aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. याच सिनेमासाठी ती विदेश दौऱ्यावर जात असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, तिला दौरा रद्द करावा लागला. अर्ध्या वाटेवरुन तिला परत यावं लागलं. तिच्या परिवारातील अनेकांनी रुग्णालयात हजेरी लावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये