ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ‘भारत जोडो यात्रे’त सामिल होणार का? काँग्रेस नेत्याने स्पष्टच सांगितलं!

मुंबई : (Ashok Chavan On Aaditya Thackeray) देशाच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी देशभ्रमण करत असलेले काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रे’त राज्यातील महाविकास आघाडीतील नेतेही सहभागी होणार आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे देखील या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे भारत जोडो ‘यात्रे’त सहभागी होण्याबाबत सध्या संभ्रम असला तरी, आदित्य ठाकरे मात्र यात सहभागी होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे ९ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

भारत जोडो यात्रा सोमवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री उशीरा महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत होतं. यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या ही यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथंपर्यंत पोहोचली आहे. भव्य मशाल यात्रेद्वारे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये