ताज्या बातम्यारणधुमाळी

“आले रे आले…”, बंडखोर आमदारांची एन्ट्री आणि शिवसैनिकांचा हल्लाबोल!

मुंबई | Maharashtra Assembly Session – राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार पहिल्यांदाच विधिमंडळ अधिवेशनाला सामोरे जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी शिंदे गटाच्या आमदारांना डिवचले आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर शिवसेना व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोषणाबाजी करत निशाणा साधला. शिंदे गटाचे आमदार विधानभवनात येत असताना विरोधक आणि शिवसैनिकांनी ‘आले रे आले, गद्दार आले’ अशी घोषणाबाजी केली आहे.

विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाबाहेर विरोधक चांगलेच आक्रमक दिसले. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात ओला दुष्काळ लागू करा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांबाबत विरोधकांनी घोषणाबाजी केली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांकडून ही घोषणाबाजी सुरू होती. या दरम्यानच, शिंदे गटाचे आमदार विधानभवनात एकाच वेळी जात होते. त्यांना पाहून विरोधकांनी ‘आले रे आले, गद्दार आले’, अशी घोषणा देण्यास सुरूवात केली.

दरम्यान, विरोधकांच्या आंदोलनात आदित्य ठाकरे देखील सहभागी झाले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना, त्यांनी म्हटलं की, “आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, बेईमानांचं सरकार असल्याचा हल्लाबोल आदित्य यांनी केला आहे. 

 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये