
मुंबई : सध्या भोंगा आणि हनुमान चालिसा वाद देशभरात चर्चेत आहे. यावर अनेक नेते या विषयावर त्यांची मतं मांडत आहेत. अशातच बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने देखील प्रतिक्रिया दिली आहे. देशात सुरू असलेल्या या वादामुळे सोनू सूदला प्रचंड दु:ख होत आहे.
पुण्यात पार पडलेल्या JITO कनेक्ट 2022 समिट दरम्यान सोनू सूदने भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर भाष्य केलं आहे. यादरम्यान त्याने लोकांना एकत्र येण्याचं आवाहन देखील केलं आहे. सोनू सूद नेहमीच देशात सुरू असलेल्या अनेक समस्यांवर भाष्य करत असतो. लोकांना आता धर्म आणि जातीचं बंधन तोडायला हवं, असं सोनू सूदनं म्हटलं आहे.
भोंगा आणि हनुमान चालीसा वादावर सोनू सूद म्हणाला, “कोरोना काळात लोकांनी धर्म बाजूला ठेवला आणि एकमेकांना मदत केली. समाजात फक्त माणुसकी आणि बंधुता पाहायला मिळावी, असं वाटत असेल तर भोंगा आणि हनुमान चालीसा वाद संपायला हवा”.