देश - विदेश

‘या’ बाॅलिवूड निर्मात्याला अमित शहांसोबतचा फोटो शेअर करणं पडलं महागात, पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई | आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. तसंच पूजा सिंघल यांच्यासोबत गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो शेअर केल्याप्रकरणी चित्रपट निर्माते अविनाश दास यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अविनाश दास यांना गुजरात पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.

अविनाश दास यांना पुढील कारवाईसाठी अहमदाबाद येथे आणण्यात येत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डीपी चुडासामा यांनी सांगितलं की, आम्ही अविनाश दास यांना मंगळवारी मुंबईतून ताब्यात घेतलं. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आमची टीम त्यांना अहमदाबादला घेऊन येत आहे.

दरम्यान, अहमदाबाद क्राइम ब्रँचनं अविनाश दास यांच्याविरुद्ध कलम 469 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसंच आयटी अॅक्ट आणि राष्ट्रीय प्रतिकांचा अपमान केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश दास यांनी फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेचा फोटोही शेअर केला होता, ज्यामध्ये ती तिरंगा परिधान करताना दिसत होती. तर आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये