नवीन प्रतिजैविक औषधाच्या शोधामुळे दरवर्षी सुपरबग्जमुळे बाधित होणारे सुमारे सत्तर लाख जीव वाचू शकतात. सुपरबग्ज हे जीवाणू प्रतिजैविकांच्या अति किंवा अयोग्य वापरामुळे कुचकामी झाले आहेत. मात्र बॅक्टेरिया रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात. ब्रिटिश शास्त्रज्ञांनी आता एका संशोधनात सुपरबग्ज मारणारे प्रतिजैविक शोधून काढले आहे.
नवी दिल्ली : लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आलं आहे, की या औषधाने कोणत्याही निरोगी ऊतींना इजा न करता उंदरांमध्ये सुपरबग मारले आहेत. टिक्सोबॅक्टिन हे पहिलं प्रतिजैविक आहे, जे सिंथेटिक आहे.
कोविडदरम्यान, लोकांना अनेक प्रकारची प्रतिजैविकं दिली गेली; ज्याचा विषाणूवर कोणताही परिणाम झाला नाही. त्यामुळे सुपरबगमुळे जीव गमावणार्यांची संख्या वाढली. ब्रिटिश सरकारच्या आयोगाने असा अंदाज लावला आहे की, २०५० पर्यंत सुपरबग्ज दरवर्षी आणखी एक कोटी लोकांचा बळी घेऊ शकतात. उंदरांमधील एमआरएसए सुपरबग मारण्यात टिक्सोबॅक्टिन यशस्वी ठरले, ज्यावर आतापर्यंत अनेक प्रतिजैविकं कुचकामी ठरली आहेत. मानवामध्ये आढळणार्या अनेक जीवाणूंना मारण्यातही याला यश आलं आहे. सुपरबगपासून शेवटचा बचाव म्हणून त्याचा वापर केला जाईल. टिक्सोबॅक्टिन खोलीच्या तापमानावर साठवलं जाऊ शकतं. यामुळे ते जगभर सहज पाठवलं जाऊ शकतं.
२०१५ मध्ये अमेरिकेत हे औषध विकसित करण्यात आलं होतं. तेव्हा त्याचं उत्पादन खूप महाग असल्याने सर्वसामान्यांना माहिती देण्यात आली नाही. आता २००० पट कमी खर्चात त्याचे सिंथेटिक फॉर्म बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. आता टिक्सोबॅक्टिन मोठ्या प्रमाणात बनवता येते.