मनोरंजन

‘…पण ते पुरं करायचं’; मधुराणी प्रभूलकरची पोस्ट चर्चेत

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. तसंच या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभूलकर ही सध्या चांगलीच चर्चेत आहे. आई कुठे काय करते या मालिकेमुळे तिला घराघरात एक वेगळीच लोकप्रियता मिळाली आहे. नुकतंच मधुराणीने जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर केली आहे. तसंच तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

मधुराणी प्रभूलकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तसंच ती नेहमी मालिकेतील विविध भागांवर भाष्य करत असते. नुकतंच मधुराणीने जागतिक पुस्तक दिनानिमित्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल झाली आहे. या पोस्टद्वारे तिने तिचा सेटवर पुस्तक वाचतानाचा फोटो शेअर केला आहे. तसेच पुस्तक वाचनाचे काही किस्से देखील सांगितले आहेत.

मधुराणीने पोस्टमध्ये लिहीलं आहे की, मिळेल ती जागा आणि मिळेल तितक्या क्षणांची फुरसत चिमटीत पकडायची आणि जमेल तितकं वाचायचं, भले एक पुस्तक वाचायला महिना लागो पण ते पुरं करायचं….वाचलं नाही काही चांगलं तर फार अस्वस्थ होतं. मी एक शक्कल लढवलेय. सेटवर एक, मी सकाळचा चहा प्यायला बसते तिथे एक आणि बेडवर एक अशी तीन पुस्तक ठेवलेली असतात… तिन्ही वेगवेगळ्या प्रकारची…. जमेल तसं…दोन पानं कधी चार. पण वाचायचं…वाचत राहायचं.

जागतिक ग्रंथ दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सध्या मी वाचत असलेली पुस्तकं १. मंद्र . भैरप्पा, २. सूर्य गिळणारी मी . अरुणा सबाने, ३. जग बदलणारे ग्रंथ . दीपा देशमुख…तुम्ही काय वाचताय??? असे मधुराणी या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यासोबत तिने कोणती पुस्तक वाचताय असा प्रश्नही चाहत्यांना विचारला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये