कान्स चित्रपट महोत्सवाला नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा; ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवात शुभेच्छा दिल्या आहेत. आजपासून या ‘कान्स चित्रपट महोत्सवा’ला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 व्या कान्स चित्रपट महोत्सवासंदर्भात ट्वीट करत महोत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.
ट्विट करून नरेंद्र मोदींनी लिहिलं आहे की, “75 व्या कान्स चित्रपट महोत्सावात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असल्याने खूप आनंद होत आहे. तसेच भारत आणि फ्रान्सच्या राजकीय संबंधांनादेखील 75 वर्ष पूर्ण होत आहेत, हे खूप अभिमानास्पद आहे.” असं त्यांनी लिहिलं आहे.
पोटरा’, ‘कारखानीसांची वारी’ आणि ‘तिचं शहर होणं’ या तीन मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आहे. फ्रेंच अभिनेता व्हिन्सेंट लिंडन यांच्या अध्यक्षतेखालील 75व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी 8 सदस्यीय ज्युरींमध्ये दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आहे. चित्रपट महोत्सवात भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोण ज्युरी म्हणून दिसणार आहे. तर सत्यजित रे यांचा ‘प्रतिद्वंदी’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे.