Top 5अर्थताज्या बातम्यादेश - विदेशपुणेमहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

तैयार हम..! बेरोजगारांची ऑफर

“साहेब..आम्हाला पेन्शन नको..संपूर्ण पगारही नको..फक्त अर्ध्या पगारावर नोकरी करण्यास आम्ही तयार आहोत”, अशी हाक सुशिक्षित तरूण-तरूणींमधून दिसून येत आहे. जुनी पेन्शन थांबवा, महाराष्ट्र वाचवा! आम्ही तयार आहोत, अर्ध्या पगारावर काम करायला. अशी एक घोषणाच सुशिक्षित तरूण-तरूणींनी केली. याबाबत एक पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमधून सुशिक्षित बेरोजगारांची हीच हाक माय-बाप सरकारने ऐकावे, अशीच एक तळमळ असल्याचे दिसत आहे.

विनोद आवळे
पुणे : राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनसाठी रोष व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांचा मात्र चक्क अर्ध्या पगारावर काम करण्यास तयार असल्याचे म्हणत चांगलाच रोष निर्माण झाला असल्याचे दिसत आहे. जुन्या पेन्शनसाठी संप पुकारणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विरोध तसेच समर्थनाच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. सरकारी कर्मचारी जनतेला त्रास देत असल्याने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे संपाची खुलेआम खिल्ली उडवली जात असल्याचेही दिसून येते तर दुसरीकडे एका व्हायरल पोस्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात सुशिक्षित तरूणाईंमध्ये प्रचंड रोष असल्याचे पाहायला मिळते.

कोल्हापुरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जवळपास फिक्स झाले आहे. या मोर्चाची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्याचे दिसले. व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. – संबंधित बातमी इथे पाहा

खरे तर संपाचा परिणाम राज्यभरातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, रुग्णांवर होत असल्याचे दिसून येत आहे. हा संप मिटणार कधी?, सर्वसामान्यांना सोयी सुविधा, सवलती मिळणार कधी? याच्याच प्रतीक्षेत सध्या नागरिक आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी या संपामुळे रुग्णाचेही मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे.

एकीकडे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी नोकरीसाठी झगडा देत आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील तरूणाई दिवस-रात्र अभ्यास करून नोकरी कशी मिळेल, याची वाट पाहत आहेत. अनेक तरूण-तरूणी सुशिक्षित बेरोजगार आहेत, काम कसे मिळेल, याचीच एक तळमळ त्यांच्या मनात असते. पण “सरकारी जागा, नाही काही जादा” अशा अवस्थेमुळे कित्येक तरूणाई नोकरीपासून वंचित आहे. ही अवस्था पाचवीला पुजलेलीच. अशांना “पेन्शनचे टेन्शन नाही तर नोकरीचे टेन्शन आहे.”

या संपाबाबात सर्वसामान्यांशी काहीही देणेघेणे नाही. सर्वसामान्यांना कोणतीही सहानुभुतीही नाही. सर्वसामान्यांना एकवेळचा घास अन् महिन्याचा पगार मिळवूपर्यंत नाकीनऊ झाले आहे. दुसरीकडे पगार नाही तर चक्क पेन्शनसाठी राज्यभर गोंधळ उडाला असल्याने सरकार आणि संप यामध्ये सर्वसामान्यंच अडकलेत. एकीकडे दहावी बारावी परीक्षा सुरू आहेत, स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत. अशात जुन्या पेन्शनसाठी संपाचा सपाटा सुरू असल्याने विद्यार्थांचे लक्ष विचलीत होत असल्याचे सर्वसामान्य म्हणत आहेत. संपाच्या कचाट्यात अडकलेल्या सर्वसामान्यांना तरी दैनदिन सोयी, सवलतीसाठी लवकर न्याय मिळावा एवढेच..!

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये