मराठवाड्यातील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा!

औरंगाबाद : (Chance of moderate rain with gusty winds) परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं उभं पिक पावसात वाहून गेलं. आता पुन्हा एकदा आवकाळी पाऊस काळ बनुन उभं राहणार राहिला आहे. नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे आज औरंगाबाद, जालना, बीडसह ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जनेसह मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
त्यामुळे औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाने केले आहे. एका बाजूला थंडीत वाढ होत असतानाच अचानक नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर काही जिल्ह्यात आज अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्या हवामानातील बदलामुळे तापमानात कमालीचे चढ-उतार होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अधूनमधून ढगांची गर्दी होतांना दिसत आहे. दोन दिवस अतिथंडी जाणवत असल्याचे चित्र असतांना गेल्या चार दिवस उकाडा जाणवत आहे. तसेच सोमवार ते बुधवार या काळात आकाशात ढगांची गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर औरंगाबादसह मराठवाड्यात वारे 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची व मेघ गर्जनेसह तुरळक ठिकाणी अवकाळी ते हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.