क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

Ind Vs Pak : विजयी घोडदौड कोणाची थांबणार? नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला देणार साथ?

IND vs PAK World Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून हे जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या हाय व्होल्टेज सामन्यात गोलंदाजांसाठी देखील उत्साहवर्धक वातावरण असेल. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी आपले दोन्ही सामने जिंकून वर्ल्डकपची धडाक्यात सुरूवात केली आहे. मात्र 14 ऑक्टोबरला या दोन पैकी एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही धावांसाठी ओळखली जाते. या मैदानावर झालेल्या बऱ्याच सामन्यात फलंदाजांनीच वर्चस्व गातवलं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे इंग्लंड – न्यूझीलंड सामना! या सामन्यात वेगवान गोलंदाजांना सुरूवातीला जास्त स्विंग आणि बाऊन्स मिळाला, मधल्या षटकात फिरकीपटूंनाही देखील मदत मिळाली.

मात्र असे असले तरी देखील फलंदाजांनी देखील चांगला फटकेबाजी केल्याचे दिसून आले. एकंदर नरेंद्र मोदी स्टेडियमवरील खेळपट्टी ही सर्वांसाठी काही ना काही ऑफर करते. त्यामुळे सामना नक्कीच रोमांचक होणार.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये