आरोग्यफिचर

डोळ्यांच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये…

आजकाल काम आणि खेळ दोन्हींसाठी एकच तंत्रज्ञान वापरले जाते. खेळ असो वा काम समोर एक स्क्रीन असतेच. मग ती मोबाईलची असो, कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉप, टॅबलेटची. या स्क्रीनवर खूप काळ सातत्याने बघत राहिल्याने डोळ्यांचे विकार बळावतात. त्यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा, ताण येणे, डोळे जडावणे, डोकेदुखी असे त्रास होतात. त्यामुळे आपल्याला अनेक विकारांना सामोरे जावे लागेल.

टेलिव्हिजन, आयपॅड, कॉम्प्युटर मॉनिटर्स, मोबाईल फोन्स यांच्या LCD आणि LED डिस्प्लेमधून निघणारी किरणे डोळ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय हानिकारक असतात. हे तंत्रज्ञान जे ब्लू रंगाचे diodes परावृत्त करतात, त्यामुळे डोळ्यांना एका ठिकाणी बघणे, लक्ष केंद्रित करणे कठीण होते. तुम्ही जे काही बघत असता तिथे लक्ष केंद्रित करण्याचा आयलेन्स प्रयत्न करीत असताना आयबॉलमध्ये असलेल्या स्नायूंचा आकार बदलतो.

डोकेदुखी : डोकेदुखी ही समस्या आजकाल सर्वसाधारणपणे सगळ्याच वयोगटात विशेषतः टीनएजर्समध्ये आढळून येते. अतिशय व्यस्त जीवनशैली, दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसणे, मोबाईलवर गेम खेळणे, त्याचबरोबर कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीन डोळ्यांच्या जास्त जवळ असल्याने हा त्रास होतो. ही डोकेदुखी नंतर गंभीर रूप धारण करू शकते. तुम्ही स्क्रीनच्या फार जवळ असता किंवा मोबाईल डोळ्याच्या फार जवळ धरता, त्यामुळे तुमच्या डोळ्यांवर अतिशय ताण येतो. शक्य तितके स्क्रीनपासून लांब राहण्याच्या प्रयत्न केला पाहिजे.

कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम : साधारणपणे आपण दिवसभर कॉम्प्युटरसमोर असतो. त्यामुळे ही समस्या टीनएजर्स आणि मध्यम वयोगटामध्ये दिसून येते. कॉम्प्युटरसमोर अधिक काळ काम केल्याने शरीरसंवेदना, अस्पष्ट दिसणे, डोळे लाल होणे, जडावणे, दुखणे, त्याचबरोबर मान, पाठ, डोके दुखणे असे त्रास होऊ लागतात. घरात, कामाच्या ठिकाणी एसी असल्यामुळे डोळे कोरडे होण्याचा त्रास होतो. हे त्रास गंभीर स्वरूपाचे नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सतत कॉम्प्युटरवर बसून राहणार्‍या मुलांना वेळोवेळी ब्रेक घेण्यासाठी प्रवृत्त करा. डोळ्यांची उघडझाप करण्यास सांगा किंवा डोळ्यांवर पाणी मारण्याचा सल्ला द्या. जर डॉक्टरांनी आयड्रॉप वगैरे दिलं असेल तर ते नियमित वापरायला हवे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये