मनोरंजन

‘डॅडी’ इज बॅक! ‘दगडी चाळ २’ या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला!

मराठी चित्रपट सृष्टीत वेगवेगळ्या भूमिका साकारणारे अनेक कलाकार आहेत. त्यातील अभिनेता मकरंद देशपांडे हे एक आहेत. नुकताच ‘दगडी चाळ-2′ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये मकरंद देशपांडे यांनी अरुण गुलाब गवळी याची भूमिका साकारली आहे. मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चेत असलेला दगडी चाळ या चित्रपटाचा पहिला भाग बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. आता दगडी चाळ भाग दोन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

दगडी चाळ या चित्रपटामध्ये मुंबईतच राहून आपल्या मराठी लोकांच्या पाठीशी उभा राहणारा. चाळीतल्या मराठी माणसावर अन्याय झाला तर स्वतः न्याय देणारा दगडी चाळीचा रॉबिन हूड, म्हणजेच अरुण गुलाब गवळी उर्फ ‘डॅडी’ या नावाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा ‘दगडी चाळ’ हा चित्रपट आहे. त्यामधील ‘चुकीला माफी नाही’, हा डायलॉग सर्वात जास्त गाजला आहे. हाच अरुण गुलाब गवळी यांचा दबदबा सर्वांनीच अनुभवला. यामध्ये मकरंद देशपांडे यांनी केलेला अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

आता नुकताच सोशल मीडियाद्वारे दगडी चाळ-२ या चित्रपटाच्या टीझर प्रदर्शित झाला असून त्याच्या प्रदर्शनाची तारीख सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट चद्रकांत कणसे यांनी दिग्दर्शित केला असून येत्या १८ ऑगस्ट रोजी तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील अरुण गुलाब गवळी म्हणजे अभिनेता मकरंद देशपांडे यांची एन्ट्रीची प्रेक्षकांना नक्कीच ओढ लागली आहे. तर या चित्रपटाचे निर्मात्या संगीता अहिर यांनी देखील ‘दगडी चाळ २’ प्रदर्शनाची घोषणा करताना आम्ही हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे करू शकलो असं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये