ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

आदित्य ठाकरेंनी ‘त्यांचा’ आदर्श घ्यावा, केसरकर

मुंबई : (Deepak Kesarkar On Aditya Thackeray) माजी मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रेदरम्यान शिवसैनिकांना संबोधताना म्हणाले होते की, बंडखोर ‘शिवसैनिक असते, तर हिमतीने उभे राहिले असते. आम्ही बंड नाही तर, उठाव केला असे ते म्हणत आहेत. पण ते बंड नाही, उठाव नाही, तर ती गद्दारी आहे. उठाव करण्यासाठी हिंमत लागते. बंड करण्यासाठी ताकद लागते. त्यांना बंड किंवा उठाव करायचा असता तर ते महाराष्ट्रात थांबले असते. सुरत, गुवाहाटीला पळून गेले नसते त्यामुळं एकप्रकारे ही ठरवून केलेली गद्दारीच आहे, अशी त्यांनी टोलेबाजी शिंदे गटावर केली.

यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरे यांच्यावर टोलेबाजी केली. आदित्य ठाकरे तरुण आहेत. कसे वागावे, कसे बोलावे याचा त्यांनी उद्धव ठाकरेंकडून आदर्श घ्यावा, असा सल्ला केसरकर यांनी यावेळी दिला. आदित्य ठाकरे माझ्या निम्म्या वयाचे आहेत. मात्र, ते आले की आम्ही खुर्चीवरुन उठतो, कारण त्यांचे आजोबा बाळासाहेबांना आम्ही मान देतो. तुम्ही बाळासाहेबांचे नातू आहात म्हणून तुम्ही शिवसैनिक आहात पण, आमच्या रक्तात बाळासाहेबांनी शिवसेना भिनवली आहे. असे म्हणत केसरकरांनी आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असा दावा पुन्हा एकदा केला.

आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत. म्हणून प्रसंगी आमची आमदारकी पणाला लावून आम्ही शिवसेनेत राहिलो. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चालतो. काल राहुल शेवाळेंनी सांगितल. की पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची युतीसंदर्भात चर्चा सुरु होती. तसे जर झाले असते तर, अडिच वर्षानंतर मुख्यमंत्रीपद भाजपला द्याव लागलं असतं. त्यावेळी त्यांना कोण म्हटलं असत का बाळासाहेबांच्या पुत्राला खुर्चीवरुन खाली उतरवल? तुम्ही जे करणार होता त्याप्रमाणे ते पद जाणार होत भाजपकडे. आज शिंदेंनी लढा दिला म्हणून पाच वर्ष शिवसेना महाराष्ट्रात सत्तेवर राहू शकते. ही वस्तुस्थिती असल्याचे केसरकरांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये