जनतेच्या भावनांशी खेळू नका : मुरलीधर मोहोळांचे मत

पुढार्यांनो, राजकारण करा, पण जनतेच्या भावनांशी खेळू नका, असे विरोधकांना वेळोवेळी सांगणारे पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ माझे राजकारणातील आदर्श आहेत. मोहोळ महापौर झाले आणि काही महिन्यांतच कोरोनाने पुण्यात डोके वर काढले. अख्ख्या विश्वावर हे जीवघेणे संकट मागील दोन वर्षांपासून घोंघावत होते. पण स्वतःला जनतेत झोकावून घेत सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून जाण्याचे काम पुण्यनगरीचा प्रथम नागरिक म्हणून मोहोळसाहेब यांनी केले. पुणे शहराला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी महापालिका यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत होती. या लढ्याचे नेतृत्व करीत असलेले पुणे शहराचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाने गाठले होते. कोरोनातून बाहेर पडल्यानंतर ताबडतोब ते आपल्या कामाला लागले. पुणे शहर अनेक वेळा कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असलेले शहर म्हणून ओळखले जात होते. याच शहराला पूर्वपदावर घेऊन येण्यासाठी महापालिकेने जीवाची पराकाष्ठा केली. या केलेल्या मेहनतीला अखेर यश मिळाले आणि पुणे शहर कोरोनाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर आले.
यामध्ये मोहोळ यांचा सिंहाचा वाटा आहे. पुण्याचे नेतृत्व करीत असतात, त्यांनी महापालिकास्तरावर कोरोनाच्या वेळोवेळी आढावा बैठका घेतल्या. शासकीय अधिकार्यांना मार्गदर्शन केले, सामान्य नागरिकांना ऑनलाइनच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना दिल्या. त्या भयाण परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेची नेमकी काय तयारी आहे, याचा आढावा मोहोळ घेत राहिले. महापालिकेने व्यवस्थित तयारी केली होती. बेडची व्यवस्था, ऑक्सिजन प्लांटची व्यवस्था पुरेशी आहे. चिंतेचे कारण नाही, असे मनपाकडून सांगितले जात होते.
पुणे शहरात नव्याने सापडणारे रुग्ण नेमके कुठल्या प्रकारातील आहेत. त्यातील पहिल्यांदा बाधित झालेले किती आहेत? त्यातील पहिला डोस झालेले आणि दुसरा डोस झालेले किती आहेत? याचीही माहिती घेतली जात होती. लहान मुलांसाठी महापालिकेने विशेष रुग्णालये सुरू केली आहेत. हडपसर, वारजे आणि बाणेर इथे नवी रुग्णालये सुरू झाली. कोरोनाशी लढा अजूनही सुरूच आहे. याबरोबरच शहर विकासाची अनेक कामे त्यांच्या कार्यकाळात पार पडली. नदीसुधार योजना मंजूर झाली, मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आहेत. अंतर्गत रस्त्याची कामे झाली आहेत. कचरा नियोजन, मलनिस्सारण प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले आहे. २४ तास पाणी आणि तास वीज देऊन अनेक गोष्टींवरदेखील मोहोळ यांनी लक्ष केंद्रित केले आहे.