ताज्या बातम्यामहाराष्ट्रमाय लिडररणधुमाळी

‘अजित पवार भाषणांतून नवचैतन्य निर्माण करणारे नेते’: स्वप्नील मोहिते

माझे राजकारणातील आदर्श नेते अजितदादा पवार हे आहेत. माजी उपमुख्यमंत्री पवारसाहेब हे ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या भूमिकेतून सातत्याने जनतेचे कार्य करीत आहेत. त्यांची प्रशासनावरील जबरदस्त पकड, रोखठोकपणा, स्पष्टवक्तेपणा, पारदर्शी कारभार यामुळे सर्व पक्षातील नेत्यांना दादांच्या कार्यकौशल्याचे कौतुक वाटते. जनसामान्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे.

किंबहुना कोणत्याही मुद्यांवर ते अत्यंत संवेदनशील आसतात. त्यांची वक्तृत्व शैली, सर्वसामान्य बहुजन समाजाला आपलेसे करणारी आहे. त्यांच्या विरोधकांनी केलेली टीका खिलाडू वृत्तीने ते घेताना दिसतात. त्यांच्या शैलीत विनोदाची झालर आढळते. त्यामुळे सर्वसामान्यांना दादा आपलेसे वाटतात. पुरोगामी आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्यासाठी ते अहोरात्र झटत आहेत. असा अभ्यासू मुरब्बी नेता, स्पष्टवक्ते, मुत्सद्दी, राजकीय नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे आशेने पाहतो आहे. लोकनेते आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वात दिशा घेत अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपल्या तत्पर व आक्रमक शैलीने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचे संघटन कौशल्य, कामाची धडाडी, तत्परता, नेतृत्वगुण व प्रशासनावरील उत्तम पकड याचे कौतुक दिग्गज नेत्यांपासून ते विरोधकही खुल्या मनाने करतात.

राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन ते राजकारण करतात. त्यामुळेच लोकांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या समजावून घेऊन त्यांच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याचे कामदेखील अनेकवेळा अजितदादांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये