पुणे

सिंहगडावर जाण्यासाठी सुरू होणार इलेक्ट्रिक बस

पुणे : १ मे म्हणजे महाराष्ट्रदिन या दिवसापासून वनविभाग व पीएमपीएल यांच्या माध्यमातून सिंहगडावरील घाट रस्त्यातील होणारी गर्दी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बस सेवा सुरु केली जात आहे. ही सेवा पीएमपीएमएल’च्या माध्यमातून सुरू करण्याचे नियोजन असून तसा वनविभाग, पीएमपीएमएल यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. तर बस सेवा सुरु झाल्यानंतर खाजगी प्रवाशी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

तसंच गडावर ई- बसने ये- जा करण्यासाठी एका व्यक्तीला १०० रुपये प्रवास भाडे आकारले जाणार आहे . वाहतूक व्यवस्था सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी इलेक्ट्रिक बसची सेवा सुरु करण्यात येणार आहे. वन संरक्षण समिती, डोणजे – घेरा सिंहगड यांच्या माध्यमातून इ- बस सेवेचा निर्णय घेण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी सिंहगडावर जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे दुपारच्या सुमारास तेथील वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरते मग घाटामध्ये पर्यटक वाहन उभी करून पायी चालत गडावर जातात. परंतु घाटामध्ये रिकामी जागा नसल्यामुळे जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी ऑक्टोबर महिन्यात वनविभागाच्या विविध उपक्रमाची सुरवात केली होती . यावेळी पवारांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून ई- बस सुर करण्यात यावेत असं सांगण्यात आलं होत. तसंच पहिले चार महिने या ई- बसच्या फेऱ्यांची ट्रायल घेण्यात येणार आहे .

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये