सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बाॅयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला…
![सुष्मिता सेन आणि ललित मोदींच्या रिलेशनशिपवर एक्स बाॅयफ्रेंडची प्रतिक्रिया, म्हणाला... rohman shawl and sushmita sen lalit modi](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/rohman-shawl-and-sushmita-sen-lalit-modi-780x470.jpg)
मुंबई | EX-Boyfriend’s Reaction To Sushmita And Lalit Modi’s Relationship – बाॅलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. एवढंच नाही तर ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. नुकंतच या संपूर्ण प्रकरणावर तिचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉलने प्रतिक्रिया दिली आहे.
सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याबाबत 2010 मध्येच चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावेळी या दोघांनी त्यांच्या नात्याबाबत मौन पाळणंच पसंत केलं. नुकतंच सुष्मिता सेनचा एक्स बाॅयफ्रेंड रोहमन शाॅलने पिंकविलाला मुलाखत दिली. त्यावेळी त्याला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “आपण त्यांच्यासाठी आनंदी राहायला हवे. प्रेम हे खूप सुंदर आहे. मला फक्त एवढंच माहिती आहे की जर तिने एखाद्याला निवडलं असेल तर तो तिच्यासाठी पात्र असेल.”
दरम्यान, रोहमन शॉल आणि सुष्मिताच्या रिलेशनशिपला 2018 मध्ये सुरुवात झाली. रोहमन सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान होता. ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. रोहमनचे तिच्या दोन्ही मुलींसोबत फार छान बॉन्डिंग होते. मात्र अवघ्या तीन वर्षात रोहमन आणि सुष्मिताचा ब्रेकअप झाला. त्यांनी याबद्दल सोशल मीडियावर जाहीर केले होते.