प्रसिद्ध अभिनेत्री निलू कोहली यांच्या पतीचं निधन, बाथरूममध्ये आढळला मृतदेह

मुंबई | Nilu Kohli Husband Death – प्रसिद्ध अभिनेत्री नीलू कोहली (Nilu Kohli) यांच्यावर दु:खाचा डौंगर कोसळला आहे. नीलू कोहलींचे पती हरमिंदर सिंह (Harminder Singh) यांचं निधन झालं आहे. काल (24 मार्च) हरमिंदर सिंह गुरूद्वारमध्ये गेले होते. तिथून घरी परत आल्यानंतर ते बाथरूमध्ये गेले. त्यावेळी ते अचानक तिथे कोसळले. त्यानंतर नीलू यांच्या घरातील हेल्परनं हरमिंदर यांना रूग्णालयात दाखल केलं. मात्र, रूग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. (Nilu Kohli Husband Death)
एका संकेतस्थळानं दिलेल्या माहितीनुसार, नीलू कोहली यांची मैत्रीण वंदना यांनी हरमिंदर सिंहंच्या निधनाची माहिती दिली आहे. वंदना यांनी सांगितलं की, नीलू कोहली यांच्या घरी एक हेल्पर होता. तो हरमिंदर सिंह यांची लंचसाठी वाट बघत होता. हरमिंदर हे बराच वेळ बाहेर न आल्यानं हेल्परनं बेडरुममध्ये जाऊन चेक केलं. पण तिथे ते नव्हते. त्यानंतर त्यानं बाथरुममधमध्ये चेक केलं तर त्याला हरमिंदर सिंह हे बाथरुममध्ये पडलेले दिसले.
पुढे वंदना यांनी म्हटलं की, हरमिंदर यांना मधुमेहचा त्रास होता. पण तरीही ते हेल्दी होते. हे सगळं अचानक झालं आहे. तसंच हरमिंदर सिंह यांच्या पार्थिवावर रविवारी (26 मार्च) अंत्यसंस्कार होणार आहेत.
नीलू कोहली या सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. त्या आपल्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी हरमिंदर सिंह यांच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
दरम्यान, हरमिंदर सिंह यांच्या पत्नी अभिनेत्री नीलू कोहली यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांनी पटियाला हाउस, हिंदी मीडियम, हाउसफुल 2 यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसंच आता त्यांची ‘यूनाइटेड कच्चे’ ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.