अर्थताज्या बातम्या

व्हॅलेंटाईन डेला सुवर्णयोग; आज सोने-चांदी स्वस्तात खरेदीची संधी

Gold Silver Rate Today : आज व्हॅलेंटाईन डे निमित्त तुमच्या जोडीदाराला काय भेटवस्तू द्यायची असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. आज तुम्हाला सुवर्णयोग साधता येईल. स्वस्तात सोने-चांदी खरेदीची हा संधी आहे. सोमवारी सोन्याच्या भावात (Gold Price Today) थोडीशी तेजी दिसून आली. तर चांदीच्या भावात (Silver Price Today) मोठी घसरण झाली. सोमवारी सोने 22 रुपये प्रति 10 ग्रॅम महाग झाले. तर चांदीच्या किंमतीत 369 रुपये प्रति किलोची घसरण झाली. त्यामुळे सोने 57000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 67000 रुपये प्रति किलो होती.

काही दिवसांपूर्वी सोन्याने 58,847 रुपये उच्चांक गाठला होता. आताचा विचार करता सोने 1822 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त विक्री होत आहे. तर चांदी ही नेमहीपेक्षा स्वस्त विक्री होत आहे. चांदीचा उच्चांकी भाव 79980 रुपये प्रति किलो आहे. 13609 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त मिळत आहे.

वायदे बाजारात, एप्रिल 2023 साठी सोन्याचा भाव 56,780 रुपये 10 ग्रॅम स्तरावर आहे. हा भाव सोन्याच्या उच्चांकी स्तरापासून अर्थात 2000 रुपयांनी कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, सोने 57,000, 57,100 रुपयांवर उसळी घेऊ शकते. तर 56,350 रुपयांवर स्टॉप लॉस लावण्यात आला असल्याच बोललं जात आहे.

लोक 18 कॅरेट सोन्याचा रोजच्या जीवनात वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये