आरोग्यसंडे फिचरसंपादकीय

आरोग्यदायी पौष्टिक अन्नच हवे!

व्हीटॅमिन सी म्हणजे ’क’ जीवनसत्त्व आणि त्याचे शरीराला होणारे फायदे.
शरीरासाठी व्हिटॅमिन सी का असते आवश्यक?

शरीरासाठी रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आंबट फळांचे सेवन करण्याचा सल्ला तज्ज्ञ मंडळींकडून दिला जातो. कारण आंबट फळांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’चे अधिक प्रमाण असते. व्हिटॅमिन सी’चा आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात पुरवठा होणे अतिशय आवश्यक आहे. या जीवनसत्त्वास एस्कॉर्बिक अ‍ॅसिड असंही म्हटलं जातं. फळे आणि भाज्यांच्या सेवनाद्वारे आपल्या शरीराला नैसर्गिक स्वरुपात ‘व्हिटॅमिन सी’ मिळते.

संत्रे, स्ट्रॉबेरी, कीवी, ब्रोकोली किंवा पालक यांसारख्या फळ आणि भाज्यांमध्ये ’व्हिटॅमिन सी’ची मात्रा भरपूर असते.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ’व्हिटॅमिन सी’मुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि यामुळे संसर्गाविरोधात लढण्यास आपल्याला मदत मिळते. शरीरात या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाल्यास आजारांची लागण होण्याची शक्यता असते. पण ‘व्हिटॅमिन सी’चे अधिक प्रमाणात सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात.

पोषक तत्त्वांचा साठा असल्याने ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात ’व्हिटॅमिन सी’चे सेवन केल्यास शरीरावर दुष्परिणाम होण्याचीही शक्यता असते. जर आपण नियमित एक हजार मिलीपेक्षा अधिक प्रमाणात ’व्हिटॅमिन सी’चे सेवन केले तर जुलाब, उलटी, छाती जळजळणे, पोटदुखी, डोकेदुखी आणि निद्रानाश यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. साधारणतः महिलांनी ७५ मिलीग्रॅम आणि पुरुषांनी ९० मिलीग्रॅम या प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’चे नियमित सेवन करावे.

कोलेजनचे उत्पादन वाढवण्यामध्ये व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. व्हिटॅमिन सीमुळे सांध्यांचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. सोबत शारीरिक जखमादेखील जलदगतीने ठीक होतात. त्वचा टवटवीत राहते. याव्यतिरिक्त अन्य शारीरिक कार्यप्रणाली सुरळीत सुरू राहण्यासाठीही व्हिटॅमिन सी आवश्यक आहे.

व्हिटॅमिन सी’मुळे रक्तवाहिन्यांचे कार्य अडथळ्याविना सुरू राहते. हृदयाला योग्य पद्धतीने रक्ताचा पुरवठादेखील होतो शरीरामध्ये व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण झाल्यास तणावाशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन सीयुक्त आहाराचे सेवन केल्यास तणाव कमी होण्यास मदत मिळते आणि आरोग्य निरोगीदेखील राहते.

त्वचेचं आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये कोलेजन महत्त्वपूर्ण भूमिका निभावतं. व्हिटॅमिन सीमुळे कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत मिळते. यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या, वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत मिळते. बहुतांश लोक व्हिटॅमिन सीयुक्त आहाराचे नियमित सेवन करतात. यामुळे शरीरात पांढर्‍या रक्तपेशी वाढतात. ज्या संसर्गाविरोधात लढण्याचे कार्य करतात आणि आपल्या शरीराचे आजारांपासून संरक्षणदेखील करतात. ‘व्हिटॅमिन सी’ आरोग्यासाठी पोषक आहे. पण कोणत्याही गोष्टीचे मर्यादित स्वरुपात सेवन केल्यासच लाभ मिळतात.

संत्री : संत्री प्रत्येक ऋतूत मिळणारे फळ आहे. भरपूर व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांपैकी संत्री हे एक फळ महत्त्वाचे मानले जाते. त्वचा उजळण्यासाठी आणि सी जीवनसत्त्व मिळवण्यासाठी संत्री खूप लाभदायक मानली जातात.

कीवी : कीवी हे असं फळ आहे जे आपल्याला प्रत्येक ऋतुमध्ये सहजपणे मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच कीवी आपल्या शरीरास बर्‍याच प्रकारचे पोषक तत्त्वही देते. व्हिटॅमिन सी पुरवणार्‍या ताज्या फळांमध्ये कीवीचं नाव आवर्जून घेतलं जातं.

पेरू : पेरू तर लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. सहसा लोक पेरूला चटणी-मीठ लावून खातात. पेरूमध्ये जवळजवळ १२६ मिलीग्राम व्हिटॅमिन सीचा समावेश असतो. तुम्ही पेरूचे सॅलाडच्या स्वरूपात किंवा स्मुदी बनवूनही सेवन करू शकता. इतकंच नाही तर पेरूमधील मॅग्नेशियमचे प्रमाण रक्ताभिसरणाचे कार्य संतुलित राखण्यासही मदत करते.

लिंबू : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. नियमितपणे कोमट लिंबू पाणी प्यायल्याने हृदयरोग, मूत्रपिंडातील दगड आणि त्वचा संबंधित समस्यांपासून मुक्तता मिळते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये