राज्यातील सत्तासंघर्षावर न्यायालयाकडून ‘तारीख पे तारीख’; पुढील सुनावणी दिवाळीनंतर!

मुंबई : (Shivsena And Shinde Group Court Hearing) एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केले. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून राज्यात शिंदे गट आणि शिवसेना यांच्याच शिवसेना कोणची? यावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू होता. शिवसेना आणि पक्षचिन्ह यावरील काल एक याचिका निकाली लागली असून त्याचे सर्व निर्णय हे निवडणूक आयोगाकडे देण्यात आले आहेत.
दरम्यान, मंगळवार दि. 27 रोजी झालेल्या न्यायालयीन सुनावणीत शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या कामकाजाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हा एक विषय निकाली निघाल्यानंतर आणखी 4-5 याचिकेवर पुढील सुनावणी लांबणीवर पडली आहे. यावर न्यायालयाकडून फक्त ‘तारिख पे तारिख’ देण्याचे काम सुरू आहे. विरोधकांच्या म्हणण्यानूसार, राज्यात घटनाबाह्य असणारे सरकार न्यायालयाच्या निर्णयामुळे किती महिने राहणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणारं आहे.
या प्रकरणात घटनापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन सुनावणी पार पडल्या आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणी कधी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्यातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावली आता थेट दिवाळीनंतर होणार आहे. 1 नोव्हेंबर ही तारीख देण्यात आली आहे. यामुळे शिवसेनेच्या चिंतेत काही प्रमाणात भर पडणार आहे. अद्यापही कोर्टासमोर सत्तासंघर्षाबाबत अनेक मुद्दे आहेत, ज्यावर निर्णय येणे बाकी आहे. मात्र, त्याआधी आयोगाचा निर्णय येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.