क्रीडाताज्या बातम्यादेश - विदेश

न्यूझीलंड 160 धावांवर सर्वबाद, कॉन्वे-फिलिप्सने डाव सावरला! सिराज, अर्शदिपचे प्रत्येकी चार बळी!

मॅक्लिन पार्क : (IND Vs NZ T20 Serial 3rd Match) विरुद्ध न्यूझीलंड असा सामना नॅपियर येथील मॅकलिन पार्क क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामन्यात नाणेफेक जिंकत न्यूझीलंडने फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांची सुरुवात खराब झाली आणि शेवटच्या षटकातही भारताने दमदार गोलंदाजी केली, पण मधल्या षटकात डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं अर्धशतकं ठोकत संघाचा डाव सावरला आणि अखेर 160 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.

भारत 161 धावा करण्यासाठी आता मैदानात उतरणार आहे. सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारताने भेदक गोलंदाजीने सुरुवात करत न्यूझीलंडचे दोन फलंदाज स्वस्तात बाद झाले.

त्यानंतर न्यूझीलंडचा डाव सावण्याचा प्रयत्न डेवॉन कॉन्वे आणि ग्लेन फिलिप्सनं संयमी तसंच फटकेबाजीने सुरुवात करत संघाचा डाव सावरला. दोघांनी संघाची धावसंख्या 100 पार पोहोचवली. दोघांनीही अर्धशतकं ठोकली असून डेवॉन कॉन्वेने 59 आणि ग्लेन फिलिप्सनं 54 धावा केल्या आहेत.

त्यानंतरचे फलंदाज मात्र अगदी एकापोठोपाठ एक बाद होत गेले. नीशाम, मिल्ने आणि ईश सोधी हेतर शून्यावर बाद झाले. भारताच्या अर्शदीप सिंहनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. सिराजनंही 4 विकेट्स घेतल्या, पण अर्शदीपची इकोनॉमी अधिक चांगली होती. तर हर्षल पटेलनही एक विकेट घेतली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये