जेलर ट्रेलर : किंग खान, खिलाडी अक्षयचा पावा; टाॅलीवूडमध्ये फक्त ‘रजनीकांत’ची हवा..
Jailer Trailer Release : किंग खान शाहरुखच्या जवानचा ट्रेलर आला, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओह माय गॉडच्या ट्रेलरनं हवा केली आहे. दुसरीकडे सनी देओलच्या गदरनं कमाल केली आहे. मात्र या सगळ्यात टॉलीवूडचे सुपरस्टार रजनीकांतच्या जेलरचा ट्रेलर समोर आला आहे. आणि त्यानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे. रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत.
आठवड्यापासून बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यात गदर २, ओह माय गॉड२ आणि जवान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. काल प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणाच्या ड्रीम गर्ल २ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. यासगळ्यात मात्र चर्चा सुरु झाली आहे ती थलायवाच्या जेलरच्या ट्रेलरची.
सोशल मीडियावर थलायवाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. रजनीकांत यांना जगभरातून चाहत्यांचे मिळणारे प्रेमही मोठे आहे. त्यांचा एखादा चित्रपट जेव्हा येतो तेव्हा चाहते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसून येते. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याच्या ट्रेलरनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.