“त्या खेळीला आम्ही ५० जण बळी पडणार नाही”; चिट्टीच्या राजकारणावरून जयंत पाटलांचा खुलासा
!["त्या खेळीला आम्ही ५० जण बळी पडणार नाही"; चिट्टीच्या राजकारणावरून जयंत पाटलांचा खुलासा jayant patil 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/07/jayant-patil--1-780x470.jpg)
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड करून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सुरुवारीला भाजप आणि शिंदे गटात युती होऊन देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अनपेक्षितपणे भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं. मात्र, एकनाथ शिंदे यांना उमुख्यमंत्री असून उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस याचं ऐकावं लागतं अशी चर्चा सुरु आहे.
एकवेळा पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोरील माईक उचलले होते त्यामुळे देखील राजकीय वातावरणात चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान, गुरुवारी (१४ जुलै) एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी बाजूला पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत असलेल्या शिंदे यांना एक चिट्टी लिहून सरकवली. आणि ती वाचून शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यानंतर तर विरोधकांनी टीकेचा पाढाच सुरु केला.
चिट्टीच्या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांचा मान उपमुख्यमंत्री राखत नाहीत, शिंदे यांना फडणवीसांच्या आदेशानुसार काम करावे लागते अशी चर्चा सोशल मिडीया वर देखील सुरु झाली. त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘एकनाथ शिंदे एक सहकारी म्हणून मला असं काहीही वाटत नाही. आमच्या ५० जणांत चल-बिचल व्हावी यासाठी विरोधक वेगवेगळ्या खेळी खेळत आहेत. पण त्यांच्या त्या खेळीला आम्ही बळी पडणार नाहीत.’ अशी प्रतिक्रिया सामंत यांनी दिली आहे. ‘माईक घेण्याचा आणि चिट्टी देण्याचा खुलासा उपमुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आता मी त्यावर बोलणं योग्य ठरणार नाही. एकनाथ शिंदे याचं खच्चीकरण व्हावं, यासाठी कोणीही राजकारण करत नाही याची मला खात्री आहे. असंही सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.