शरद पवार ब्राह्मणांचा द्वेष करत असल्याच्या राज ठाकरेंच्या आरोपावर जिंतेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादमध्ये घेतलेल्या सभेमधून पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे खासदार आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी सभेत बोलताना पवार ब्राह्मणांचा द्वेष करतात असा आरोप केला होता. यासंदर्भात प्रतिक्रिया देताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कठोर शब्दांमध्ये राज ठाकरेंवर टीका केली आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सांस्कृतिक मंडळावरील मैदानावरील सभेत बोलताना भाषणाची सुरुवात शरद पवार यांनी प्रबोधनकारांची पुस्तके वाचण्याच्या अलिकडेच दिलेल्या टोल्याला उत्तर देत केली. प्रबोधनकारांच्या पुस्तकातील संदर्भ सांगत त्यांनी पवार हे सोयीचे प्रबोधनकार सांगातात. खरे ख्रश्चन मिशनरींच्या विरोधात हिंदूमशनरी सुरू करणारे ते पहिले होते. त्यांनी धर्मातील अनेक चुकीच्या बाबीवर लिहून ठेवले आहे. पण सोयीने तेवढे पवार सांगातात असे ते म्हणाले. जेम्स लेन प्रकरण पुढे करुन शरद पवार यांनी जातीय व्देष निर्माण केला. त्यांना खरे तर शरद पवार यांना हिंदू शब्दांचीच अलर्जी असल्याची टीका केली. त्यांनी निर्माण केलेली जातीयवादाची तेढ आता महाविद्यालयाच्या स्तरावरही पोहचली आहे. आपण जात- पात मानत नाही. पण राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जन्मानंतरच जातीय तेढ व व्देष वाढल्याच्या अरोपाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “किती सभा झाल्या असतील बाळासाहेबांच्या आणि शरद पवारांच्या याची मोजणी केली तर राज ठाकरे गुणिले हजार. इतक्या सभा झाल्या असतील त्यांच्या म्हणजे साहेबांच्या निवडणुकीतील सभा ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्या सुरु व्हायच्या सकाळी आठला आणि त्या काळात संपायच्या दोनला. त्या काळात पवारांची अमरावतीला सभा झालेली तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. तेव्हा सभेच्या एक दिवस आधी त्याच हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले जिथे. तेव्हा अधिक काही बोलायला लावू नका.”
“तुमची आणि शरद पवारांच्या राजकीय जीवनाची तुलनाही करु नका. शरद पवार असे आहेत, तसे आहेत असं तुम्ही म्हणता. ते जातीयवादी आहेत असं म्हणता. ते काहीतरी सभेमध्ये बोलले की ते पुरंदरेंचा ब्राह्मण होते म्हणून ते द्वेष करत होते. मग कुसुमाग्रज पण ब्राह्मण होते,” असं म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे.
पुढे आव्हाड म्हणाले, “त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ऑपरेशन झालं. त्यानंतर अगदी कंम्पाउण्ड म्हणून त्यांची ज्यांनी सेवा केली. जे त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत, विमानात त्यांच्यासोबत, हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्यासोबत होते त्या डॉक्टरांचं नाव आहे रवी बापटय आता मी त्यांची जात सांगायची का? असे जातीवरुन मित्र ठरतात का? हे काय बोलतोय आपण कशावर बोलतोय आपण.”