…म्हणून दिवंगत विनायक मेटेंच्या पत्नी घेणार थेट राज्यस्तरीय बैठक!

बीड : (Jyoti Mete will hold a state level meeting) मागील महिन्यात शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघाती निधन झाले. दिवंगत विनायक मेटे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. यांच्या निधनानंतर संघटनेची धुरा आता त्यांच्या पत्नी ज्योती मेटे स्वीकारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, या पार्श्वभुमीवर ज्योती मेटे या पुण्यात शिवसंग्राम संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. यावेळी ज्योती मेटे कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून संघटनेची पुढील दिशा ठरविणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ६ सप्टेंबर रोजी या राज्यस्तरीय बैठकीला शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पुण्यात उपस्थित राहणार आहे.
दिवंगत मेटे यांच्या दुर्दैवी निधनाने मराठा समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नी ज्योती मेटे या संघटनेचे नेतृत्त्व करणार असून येता काळात त्या मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू लावून धरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.