न्युट्रीशियनफिचरराष्ट्रसंचार कनेक्टसंडे फिचर

सुका मेवा कधी व कसा खावा?

जान्हवी अक्कलकोटकर, आहारतज्ज्ञ

नुकतंच सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. सर्वांच्या घरी गोड पदार्थ बनवले जातात. प्रामुख्याने बाप्पासाठी मोदक बनवले जातात तसेच प्रसादाला गोड शिरा, केळं, मोदक आणि सुका मेवा देखील दिला जातो. तर आज आपण सुका मेवा कधी आणि कसा खायचा हे जाणून घेणार आहोत. याचप्रमाणे तो कशाप्रकारे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतो हेदेखील पाहणार आहोत. सुका मेव्याच्या बियात पेसीफेरिन हा अँटिबायोटिक प्रतिकारक घटक असतो .त्यामुळे माणसाची रोगाला प्रतिकार करण्याची नैसर्गिक शक्ती वाढते. त्यात ओकझोन्स हा शरीरात जीवनसत्त्वे निर्माण करणारा घटकही असतो. त्यामुळे सतत नव्या पेशी निर्माण होत राहून अकाली येणारे वृद्धत्व टळते.

कच्च्या सुक्या मेव्याने मेंदू व मज्जासंस्थाना आवश्यक अशी बी जीवनसत्वे व एकूण वाढीसाठी आवश्यक असे क जीवनसत्त्वही मिळते. याशिवाय फळांमधून लेसिथिन आणि बी कॉम्प्लेक्स गटातील जीवनसत्त्वे मिळतात. सुक्या मेव्यातून अधिकाधिक जीवनसत्त्वे मिळवण्याच्या दृष्टीने त्यापैकी ज्यांना मोड येऊ शकत असतील त्यांना मोड आणून खाणे अधिक उत्तम जसे की बदाम ,काजू. अशी कवच युक्त फळे नैसर्गिक स्वरूपात कच्चीच खावीत. त्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्निग्धता असते .यामध्ये असणारे लीनोलिक अॅसिड हृदय, रक्तवाहिन्यांना फायदेशीर असते.

सुकामेवा बारीक करून वाटून खावा.त्यातील तेलामुळे ती लवकर पचतात, मीठ घालू नये व गरमही करू नये . अधिक प्रोटिन्स साठी ती फळांबरोबर खावीत. त्यासाठी सूप अगर भाज्या यात शिजत असल्यामुळे शेवटी घालावे . नट बटर हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. शाकाहारी लोकांनी पोषक अन्न भरून काढण्यासाठी याचा वापर करता येईल.

यामुळे भूक वाढीस लागेल. सुकामेवा पासून बनणारा पदार्थ म्हणजे त्यापासून बनवलेले दूध परदेशांमध्ये अल्मंड मिल्क, सध्या खूप पॉप्युलर आहे. ज्या लोकांना लाकटोज इनटॉलरन्स सारखे आजार असतात. गाईचे म्हशीचे दूध पचवू शकत नाहीत त्यांनी 90 ग्रॅम भिजवलेली काजू/ अक्रोड /बदाम यापैकी एक साधारणपणे दीडशे मिली पाण्यात भिजत ठेवावेत मग वाटून घ्यावे. असे दूध दुधासारखे दिसते व असते ही .इतके सहज पचते की लहान मुलांनाही देता येते त्याचा त्यांना फायदाही होतो. विशेषतः बदाम वाटून केलेले दूध प्रोटिन्स ने भरपूर असून मुलांना ते आवडते ही व शरीरात पोषक तत्वे शोषली जातात. असे दूध अनेक प्रकारे उपयोगात आणता येते त्यात साखर व लिंबू पिळून त्याचे सरबतही करता येते. विरजण लावून त्याचे दही करता येते. सोयाबीन पासून सोया मिल्क व अशा दुधाचा वापर अनेक विविध प्रकारे परदेशात बराच केला जातो. खेळाडू, वजन वाढवणे ,कमी करणे अशा गटांमधील माणसांसाठी प्रोटीन युक्त आहार म्हणून एक उत्तम पर्याय असू शकतो‌.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये