संडे फिचर

खळखळून हसा…!

प्रसन्न, समाधानी मनाचा आरसा म्हणजे हास्य. ‘प्रसन्न आत्मेन्द्रिय मनः’ म्हणजे संपूर्ण आरोग्यासाठी शरीराच्या आरोग्याच्या बरोबरीने मन, इंद्रिये व आत्मा यांची प्रसन्नता तितकीच महत्त्वाची, अपरिहार्य असते.

महिन्यातून किमान एकदा मित्र- मैत्रिणींबरोबर वेळ घालवा.
सेल्फ टाइम फक्त स्वतःसाठी वेळ काढा.
फॅमिलीबरोबर विनोदी मालिका, पिक्चर पहा. भरपूर गप्पा मारा.
दिवसभरातून किमान ४ ते ५ वेळा खळखळून हसा.
स्वतः आनंदी राहा आणि दुसर्‍याला आनंद द्या.

सण्यामुळे केवळ आपला मूड सुधारत नाही, तर त्याचा शारीरिक आरोग्यावर अनेक प्रकारे, विविध प्रकारे सकारात्मक परिणाम होतो. काही वर्षांपासून “लाफ्टर थेरपी” हा शब्द आपण ऐकत आहोत. ज्यामध्ये हसणे हे एक साधन म्हणून वापरणे समाविष्ट आहे. जे क्रियाकलाप आणि व्यायामाद्वारे लोकांचे मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करते. जे त्यांना हसण्यास प्रोत्साहित करते.
हसण्याचे फायदे
१. रक्तदाब कमी करते. २.शरीराला ऑक्सिजन देते. ३.कॅलरीज बर्न होतात. ४.रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ५. मनावरचा ताण कमी होतो. ६.स्मरणशक्ती सुधारते. ७. हसण्याने मेंदूचे आरोग्य सुधारते, ते अधिक सक्रिय बनते. ८. कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते. ९.एंडोर्फिन हार्मोन तयार करते. १०.कोलेजन(एक प्रकारचे प्रथिन) उत्पादन वाढते.

हसरा आणि प्रसन्न चेहरा स्वतःसोबत इतरांनाही आनंद देतो. साहजिकच हसर्‍या व्यक्तिमत्त्वाची माणसं सर्वांनाच आवडतात. एखाद्याच्या निरागस हास्यामध्ये अनेक दुःखांना दूर करण्याचं सामर्थ्य असू शकतं. शिवाय हसणं हा एक नैसर्गिक व्यायामदेखील आहे. त्यामुळे सतत आनंदी आणि हसणारी माणसं दीर्घायुषी आणि निरोगी राहतात. हसण्यामुळे तुमच्या अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. यासाठीच हसण्याचे हे आरोग्यदायी फायदे जरूर जाणून घ्या.

ताण-तणाव कमी होतो
आजकाल सतत वाढणारी स्पर्धा आणि कामाचा ताण यामुळे मनावर सतत एक ओझं असतं. आयुष्य जगताना समोर येणार्‍या अडचणींमुळे टेंशन सतत डोक्यावर असू शकतं. थोडक्यात चिंता आणि काळजी अनेकांच्या हा जगण्याचाच एक अविभाज्य भाग असतो. मात्र सतत चिंता, काळजी करत बसल्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. हसणं हा दैनंदिन जीवनातील ताणतणावाला दूर करणारं उत्तम औषध आहे. जर ताणतणावाला दूर करायचं असेल तर हसत राहा. कारण हसण्यामुळे शरीरातील सर्व पेशी मोकळ्या होतात. ज्यामुळे ताणतणावात निर्माण होणारे हॉर्मोन्स कमी प्रमाणात निर्माण होतात.

विचारसरणी सुधारते
आजकाल माणूस सतत नकारात्मक विचार आणि चिंता काळजी करताना दिसून येतो. मनातील विचारांचा नकळत तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो. जर तुम्ही सतत नकारात्मक विचार करीत असाल तर त्यामुळे तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात. याउलट सतत आनंदी आणि प्रसन्न राहिल्यास मनात केवळ चांगले आणि सकारात्मक विचार येतात. सकारात्मक विचारांमुळे तुमची विचारसरणी सुधारते. म्हणूनच सतत आनंदाचे विचार करा आणि हसत राहा.

शरीर सुदृढ राहते
शरीराची दुखणी आणि आरोग्य समस्या दूर ठेवायच्या असतील तर नेहमी हसत राहा. कारण हसणं हा एक उत्तम शारीरिक आणि मानसिक व्यायाम आहे. हसल्यामुळे तुमच्या शरीराला व्यायाम मिळतो. शिवाय मेंदूला रक्तपुरवठा झाल्यामुळे त्याचा शरीरावर चांगला परिणाम होतो. शिवाय हॉर्मोनल असतुंलन दूर करण्यासाठी हसणं हा एक चांगला उपाय आहे.

झोप शांत लागते
जर तुम्हाला निद्रानाश अथवा अपुरी झोप लागण्याची समस्या असेल तर दररोज सकाळी उठल्यावर काही मिनिटे हसण्याचा व्यायाम करा. झोपण्यापूर्वी हा व्यायाम केल्यामुळे तुमचे शरीर हलके होण्यास मदत होते. ताणतणाव कमी झाल्यामुळे आणि रिलॅक्स वाटू लागल्यामुळे तुम्हाला शांत आणि निवांत झोप लागते.

व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो
सतत हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती इतरांना नेहमीच आकर्षित करतात. जर तुम्हाला लोकसंग्रह करण्याची सवय असेल अथवा तुम्ही सामाजिक कार्यात सक्रीय असाल तर हसण्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला परिणाम होऊ शकतो.

कामाची गुणवत्ता सुधारते
सतत टेंशन आणि ताणात काम केल्यामुळे कामाचा दर्जा घसरतो. मात्र जर तुम्हाला कामाची गुणवत्ता सुधारण्याची इच्छा असेल तर, आनंदाने ते स्वीकारा, कम करून आनंद मिळेल असे काम करा. हसणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे. हसत-खेळत काम केल्यामुळे काम तर चांगले होतेच, शिवाय कामाचा अतिताणदेखील येत नाही. कामाची गुणवत्ता सुधारते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये