महाविकास आघाडीचा मुंबई मोर्चा; शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची अशी आहे तयारी चालू!

मुंबई : (Mahavikas Aghadi Virot Morcha in Mumbai) महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल ही लाईन डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी 17 डिसेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढणार आहे. यासाठी शिवसेना (ठाकरे गट ) राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्षांनी कार्यकर्त्यांना जमवण्यासाठी तयारीला सुरुवात केलीय. प्रत्येक पक्षाने एक लाखाचं टार्गेट ठेवून जवळपास तीन लाखांहून अधिक कार्यकर्ते जमवण्याचे टार्गेट ठेवलय.
येत्या 17 डिसेंबरला मुंबईत विराट असा मोर्चा काढण्यासाठी तीनही पक्षांनी चांगलीच कंबर कसलेली पाहायला मिळते. यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकाही पार पडताना पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी मुंबईत मोठ शक्ती प्रदर्शन करू पाहत आहे. महाराष्ट्रद्रोही विरोधात हल्लाबोल या नावाने हे तीनही पक्ष एकत्र येऊन विराट असा मोर्चा काढणार आहे…
भाजपचे नेते आणि राज्यपाल यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांचा वारंवार झालेला अपमान त्याचप्रमाणे कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आक्रमक झालीये. लाखोच्या संख्येने मुंबईमध्ये ही मोर्चा काढण्यासाठी तयारी सुरू झालीय. पक्षाने जास्तीत जास्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईतपोहोचण्यासाठी तयारी सुरू केलीय….