क्रिकेटनंतर महेंद्रसिंग धोनी नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज, लवकरच करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण
![क्रिकेटनंतर महेंद्रसिंग धोनी नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज, लवकरच करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण ms dhoni](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/ms-dhoni-780x470.jpg)
मुंबई | Mahendra Singh Dhoni – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra singh Dhoni) हा जगातील महान खेळाडूंपैकी एक आहे. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषक जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला कर्णधार आहे. तसंच आयसीसीचे तीन महत्वाचे चषक त्यानं जिंकून दिले आहेत. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. यादरम्यान, तो क्रिकेटनंतर त्याची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.
महेंद्रसिंग धोनी लकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. एका मोठ्या चित्रपट निर्मात्याशी त्यानं बोलणी केली असून तो लकवरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल टाकणार आहे. धोनी तामिळ चित्रपटसृष्टीत येण्यासाठी सज्ज झाला आहे.
काही महिन्यांपूर्वीच महेंद्रसिंद धोनीनं त्याच्या स्वत:च्या ‘धोनी एंटरटेन्मेंट’ या प्रोडक्शन हाऊसची घोषणा केली होती. तेव्हाच त्यानं मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. तसंच आता तो पहिल्यांदाच अभिनय करताना दिसणार आहे. धोनी लवकरच दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तो या चित्रपटात एक महत्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. या बातमीनंतर धोनीच्या चाहत्यांमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.