ताज्या बातम्यामनोरंजन

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीनं शेअर केला अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो, कॅप्शननं वेधलं सर्वांचं लक्ष

मुंबई | Mitali Mayekar – अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) यांना मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखलं जातं. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. ते त्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसंच आता नुकतंच मितालीनं तिचा अंघोळ करतानाचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

मिताली मयेकरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं तिचा अंघोळ करतानाचा बोल्ड फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिनं या फोटोला हटके कॅप्शन दिलं आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिनं ‘अपवित्र’ असं म्हटलं आहे. त्यामुळे तिच्या या पोस्टनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

https://www.instagram.com/p/CpJ7129qLUq/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान, सध्या मिताली ही मध्य प्रदेशमध्ये फिरायला गेली आहे. तिनं शेअर केलेला फोटो हा बांधवगड जंगल सफारीदरम्यानचा आहे. तसंच तिनं शेअर केलेल्या या फोटोमुळे तिचे चाहते थक्क झाले आहेत. मितालीच्या या बोल्ड फोटोवर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये