‘बिग बाॅस 16’चा विजेता एमसी स्टॅन लवकरच अडकणार लग्नबंधनात, कोण आहे ती बूबा? जाणून घ्या

मुंबई | MC Stan Wedding – सध्या ‘बिग बाॅस 16’चा (Bigg Boss 16) विजेता रॅपर एमसी स्टॅन (MC Stan) चांगलाच चर्चेत आहे. त्याचे चाहतेही लाखोंच्या संख्येत आहेत. तसंच तो त्याच्या अनोख्या स्टाइलमुळे ओळखला जातो. आता एमसी स्टॅन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तो त्याची गर्लफ्रेंड बूबासोबत (Buba) लग्नगाठ बांधणार आहे. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र, ही बूबा नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
बिग बॉसच्या घरात एमसी स्टॅननं अनेकदा बूबाचं नाव घेतलं आहे. जेव्हा स्टॅनची आई फॅमिली वीकमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात त्याला भेटायला आली तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की,”एमसी स्टॅन लवकरच बूबासोबत लग्न करणार आहे”. त्यामुळे आता स्टॅन बूबासोबत लग्न करणार असल्याची बातमी समोर येताच त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.
नक्की कोण आहे बूबा?
एमसी स्टॅन त्याच्या गर्लफ्रेंडला ‘बूबा’ या नावानं हाक मारतो. मात्र, बूबाचं खरं नाव अनम शेख आहे. ती 24 वर्षांची आहे. तसंच एमसी स्टॅन आणि बूबाची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. बिग बॉसच्या घरात असताना स्टॅननं अर्चना गौतम आणि सौंदर्या शर्माला त्याची लव्हस्टोरी सांगितली होती. स्टॅन म्हणाला होता की,”बूबावर माझं खूप प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. त्यामुळे मी 30-40 लोकांना घेऊन बूबाच्या घरी तिला लग्नाची मागणी घालायला गेलो होतो. तेव्हा तिच्या घरच्यांना सांगितलं, आमच्या दोघांच्या लग्नाला परवानगी द्या, नाहीतर तिला पळून घेऊन जाईल”. बूबा ही स्टॅनची दुसरी गर्लफ्रेंड आहे.
एमसी स्टॅन बूबाच्याआधी औझमा शेखसोबत रिलेशनमध्ये होता. स्टॅननं औझमासोबत ब्रेकअप केल्यानंतर तिनं स्टॅनवर अनेक आरोप केले होते. त्यामुळे तो अडचणीत आला होता.