परिणीती चोप्रासोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर खासदार राघव चड्ढांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मला तिच्याबद्दल…”

मुंबई | Raghav Chadha – सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे ती बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे नेते तसंच पंजाब राज्यसभेचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या डेटिंगची. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टाॅरंटबाहेर एकत्र दिसले होते. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांवर आता राघव चड्ढा यांनी भाष्य केलं आहे.
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा एकत्र दिसल्यामुळे आता त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, याबाबत परिणीती आणि राघव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अशातच आज (24 मार्च) राघव यांना परिणीतीसोबतच्या भेटीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “तुम्ही मला राजकारणाबद्दल प्रश्न विचारा, परिणीतीबद्दल प्रश्न विचारू नका.”
पुढे तुमच्या दोघांच्या अफेअरबद्दल चर्चा सुरू आहेत, असा प्रश्न राघव यांना विचारण्यात आला. त्यावर वेळ आल्यावर आम्ही उत्तर देऊ, असं राघव म्हणाले. त्यामुळे या दोघांमध्ये नक्की मैत्री आहे की आणखी काही आहे, असा प्रश्न अजूनही नेटकऱ्यांना पडला आहे. तसंच याबद्दल परिणीतीनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.