
मुंबई : केंद्रातील तपास संस्था सध्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच परिणाम म्हणून सत्ताधारी पक्षातील अनेक नेते अटकेच्या घेऱ्यात आहेत. यापैकीच एक नाव म्हणजे अल्पसंख्याक राज्यमंत्री नवाब मलिक.
मलिकांवर जमिन खरेदी प्रकरणी याआधीच ईडीने जमीन जप्तीची कारवाई केली होती. आता मात्र त्यांच्या संपत्तीवरही सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. गोवावाला कंम्पाउंड सहीत उस्मानाबादेतील १४८ एकर जमीनही ईडीनं ताब्यात घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.
तसेच कुर्ल्यातील तीन फ्लॅट्सही ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतले आहेत. याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासहीत अनेक बड्या नेत्यांवर ईडीनं कारवाई केली होती. आता यामध्ये मलिकांचाही नंबर लागल्यानं केंद्र विरुद्ध राज्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.