ताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांची खास पोस्ट; शेअर केले ‘ते’ अनसीन फोटो

मुंबई | Parineeti Chopra – Raghav Chadha – काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि आपचे खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर त्यांचे साखरपुड्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसंच आता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.

परिणीतीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना तिनं कॅप्शन दिलं आहे की, “एकदा आम्ही एकत्र नाश्ता केला. त्यानंतर मला समजलं की मी एका योग्य व्यक्तीला भेटले आहे. तो सगळ्यात अद्भुत माणूस असून त्याचा स्वभाव शांत आणि प्रेरणादायक आहे. त्याचा पाठिंबा, मैत्री आणि विनोद बुद्धी ही निखळ आनंद देणारी आहे. तो मला माझ्या घरासारखा आहे. आमची एंगेजमेंट पार्टी ही एक स्वप्न जगण्यासारखी होती. ते स्वप्न आनंद, प्रेम, भावना आणि डान्स या गोष्टींनी सुंदरपणे फुलणारं होतं.”

तर राघव चड्ढा यांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “एका चांगल्या दिवशी या सुंदर मुलीनं माझ्या आयुष्यात प्रवेश केला. आमची एंगेजमेंट हा एक आनंदाचा प्रसंग होता. जिथे आनंद, आनंदाचे अश्रू आणि नृत्यानं आमचे प्रियजन जवळ आले. हा सोहळा पंजाबी पद्धतीनं पार पडला.” सध्या राघव आणि परिणीती यांची ही खास पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये