पुणे मेट्रोतील कामगाराचा ५० फूट उंचावरून पडून जागीच मृत्यू

पुणे : काहीच दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील मेट्रोचे उदघाटन केले आहे. मेट्रोचे काम जोमात चालू आहे मात्र अजून बराच काळ ते पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. दरम्यान पंतप्रधानांनी ज्या मार्गाचे उदघाटन केले होते तो गरवारे महाविद्यालय ते वनाज त्यातील पौड रस्त्यावरील वनाज कंपनीजवळ रविवारी रात्री उशिरा एका कामगाराचा ५० फूट उंचावरून खाली पडून मृत्यू झाला.
मूलचंद्रकुमार सीताराम असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात अकस्माक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कामगाराने सुरक्षाविषयक साहित्य देखील घातले होते. मात्र ५० फूट वरून खाली पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.