ताज्या बातम्यादेश - विदेशरणधुमाळी

“मोदींना सगळं माहिती आहे, त्यांना देवाशेजारी बसवलं तर ते देवालाही…”, राहुल गांधींचा खोचक टोला

वॉशिंग्टन | Rahul Gandhi – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. जर पंतप्रधान मोदी देवासोबत बसले तर ते विश्व कसं चालतं हे देवालाही समजावून सांगतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. काल (30 मे) राहुल गांधी अमेरिकेत गेले. यावेळी त्यांनी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान मोदींना सगळं काही माहिती असतं. देवापेक्षा जास्त त्यांना माहिती आहे. जर मोदींना देवाशेजारी बसवलं तर ते देवालाही जग कसं चालतं याबाबत समजावून सांगतील. मग देवही मोदींचं म्हणणं ऐकून गोंधळून जाईल आणि म्हणेल की, मी नक्की काय निर्माण केलंय.”

“आपल्याला सगळंच येतं, असं समजणाऱ्या लोकांचा एक गट असतो. ते शास्त्रज्ञांना विज्ञान, इतिहासकारांना इतिहास आणि लष्कराला युद्धशास्त्र समजावून सांगू शकतात. पण खरं सांगायचं झालं तर अशा लोकांना काहीच येत नाही”, असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये