…दोघांचाही बंदोबस्त मनसे करेल; राज ठाकरेंचा नेमका इशारा कोणाला?
मुंबई : (Raj Thackeray On Imtiyaz Jaleel) आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून तो औरंगाबाद येथे पार पडला. या निमित्ताानं मनसे प्रमुख राज ठाकरेंनी एक खरमरित पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आव्हान त्यांनी केलं आहे. या पत्रात पुढे त्यांनी असही म्हटलं आहे की, “आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता”.
दरम्यान ते म्हणाले, “हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताच्या अखंडतेचं स्वप्न भंगलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आले, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिसस, एकाद्या सणासारखा साजरा व्हायला पाहिजे, सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार दिला जातो हे दुर्दैव आहे. संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक ‘सजा’कर येऊन बसले आहेत, असा निशाना राज ठाकरेंनी नाव न घेता खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर साधला आहे.
मात्र, मनसे लवकरच रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुले मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये, असंही त्यांमी पत्रात म्हटलं आहे.