रश्मिकाचेही उर्फिच्या पावलावर पाऊल? बोल्ड फोटोशूटमुळे रश्मिका होतेय ट्रोल
मुंबई | रश्मिका मंदाना केवळ दक्षिणेतीलच नव्हे तर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाव्यतिरिक्त रश्मिका तिच्या जबरदस्त फॅशनसाठी देखील ओळखली जाते. नुकतच पार पडलेल्या झी सिने अवॉर्ड्समधील तिच्या काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
रश्मिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या आऊटफिटचे फोटो पोस्ट केले आहेत. त्याचसोबत पापाराझींनीही तिचे व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यात सुरुवात केली आहे.
काहींनी रश्मिकाच्या या ड्रेसची तुलना उर्फी जावेदच्या फॅशनशी केली आहे. तर ‘जेव्हापासून ही बॉलिवूडमध्ये आली आहे, तेव्हापासून तिचा ड्रेसिंग सेन्स उर्फी जावेदसारखा होऊ लागला आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. पडद्याच्या कापडाने अत्यंत वाईट ड्रेस शिवला आहे, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.
रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिने अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासोबत भूमिका साकारली. त्यानंतर मिशन मजनू या चित्रपटात तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर केला.