ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

“मर्द असाल तर कामातून उत्तर द्या, नामर्दासारखं बाईला…” ऋता आव्हाडांनी केली विरोधकांची कानउघडणी!

ठाणे : (Ruta Awhad On Ekneth Shinde) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कळवा-मुब्रा शहरात वातावरण तापलं आहे. चौकाचौकात आव्हाड समर्थकांनी आंदोलनाला सुरुवात केला आहे. जोरदार घोषणाबाजी देण्यात येत असून यामुळे राज्य सरकाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यातच आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड आपल्या पतीच्या मदतीला धावल्या असून, त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यांत उभं केलं आहे.

 दरम्यान ऋता आव्हाड म्हणाल्या, “ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात तक्रार केली, त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. रविवार दि. 13 रोजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला भाजपचं कोणीचं आलं नव्हतं, मात्र, त्या एकट्याच तिथे आल्या यामुळे शंका निर्माण होत आहे. शिंदेंच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी असताना, एवढ्या समोर का थांबलात? असं आव्हाड संबंधित महिलेला म्हणताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. एखादा गुन्हा दाखल करताना त्या गुन्हाला काही गाईडलाइन्स असतात. आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करताना कोणत्या दृष्टीने तो विनयभंग वाटतो? असाव सवाल त्यांनी केला आहे. मर्द असाल तर सत्ताधाऱ्यांनी कामातून उत्तर द्यावं. बाईला पुढे करुन लढाई लढू नका”, अशा शब्दात त्यांनी विरोधकांची कानउघडणी केली आहे.

“अशा प्रकारचे गुन्हे दाखल करुन आव्हाडांच्या राजकीय करिअरची हत्या करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधकांनी असे कितीही प्रयत्न केले तरी, ते संपणार नाहीत. याउलट आम्ही आणखी जोमाने कामाला लागू असं म्हणत विरोधकांना त्यांनी एकप्रकारे ललकारलं आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं म्हणजे, त्या बाईचा बालिशपणा असून त्याला सत्ताधाऱ्यांची साध आहे. असं वागणं बरं नव्हं”, अशा प्रकारची नाराजी ऋता आव्हाडांनी बोलून दाखवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये