हरियाणात हिंसाचार; 5 मृत्यू, 50 हून अधिक पोलीस जखमी

गुरुग्राम | Haryana Violence – एकीकडे देशभर मणिपूरमधील हिंसाचारामुळे वातावरण तापलं असताना आता हरियाणामध्ये (Haryana) घडलेल्या एका घटनेमुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. नूह येथे विश्व हिंदू परिषद आणि मातृशक्ती दुर्गा वाहिनीने काढलेल्या ब्रजमंडल यात्रेदरम्यान मेवात जिल्ह्यातील नूहमध्ये दोन गटांत हाणामारी झाली. त्यानंतर दगडफेक आणि जाळपोळ झाली. तसेच हल्लेखोरांनी अनेक वाहनेही पेटवून दिली. पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली.
नूह येथील विश्व हिंदू परिषदेच्या ब्रज मंडळ यात्रेवर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी दगडफेक केली. यातून हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूंनी दगडफेक आणि गोळीबार झाला. यादरम्यान गुडगावचे होमगार्ड नीरज आणि गुरसेवक यांच्यासह 5 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. 50 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि इतर जखमी झाले आहेत.
कर्फ्यूजन्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण परिसरात निमलष्करी दलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दरम्यान, नूहमधील परिस्थिती आता नियंत्रणात आली आहे.
नूह जिल्ह्यात मंगळवारी संचारबंदी लागू केली आहे. नूहमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे, परंतु कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसला तरी नूह आणि इतर भागात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.