ताज्या बातम्यामहाराष्ट्ररणधुमाळी

शिंदेंचं बंड पचनी; लागली मुख्यमंत्रिपदाची लॉटरी!

मुंबई : एकनाथ शिंदे  हे गोव्याहून मुंबईत दाखल झाले. शिंदे यांनी प्रथम भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी साडेसात वाजता शपथ घेणार आहेत. फडणवीस आणि शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला. हे दोघेही साडेतीन वाजता राजभवनावर गेली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला.

दरम्यान, एकनाथ शिंदे हे गोव्याहून थेट फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर शिंदे आणि भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, एकनाथ शिंदे हे एकटे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्यांचा शपथविधी सोहळा राजभवनात पार पडणार आहे.

बुधवार दि. २९ रोजी रात्री उशिरा ०९:00 वाजता सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला आणि (30 जून) बहुमत चाचणी घेण्यावर सर्वोच्च न्यायालय सुद्धा ठाम राहिलं. या निकालानंतर काही वेळातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ठाकरेंच्या राजीमान्यामुळं आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी बोलणी सुरु केली आहे. तर, दुसरीकडं महाविकास आघाडी सरकार कोसळताच भाजपाच्या गोटात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये