ताज्या बातम्यादेश - विदेशमनोरंजन

‘खतरों के खिलाडी 13’मध्ये दिसणार शिव ठाकरे अन् अब्दूची जोडी? निर्मात्यांची ‘छोटा भाईजान’ला विचारणा

Shiv Thakare Abdu Rozik On Khatron Ke Khiladi : बॉलिवूडचा लोकप्रिय सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) ‘खतरों के खिलाडी’ (Khatron Ke Khiladi 13) या कार्यक्रमाची सध्या चर्चा आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू असून असून या पर्वात सहभागी होणारे स्पर्धक दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. आता खतरों के खिलाडी’च्या तेराव्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि अब्दू रोजिकची (Abdu Rozik) जोडी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ‘खतरों के खिलाडी 13’च्या निर्मात्यांनी अब्दू रोजिकला विचारणा केली आहे. अब्दूने ‘खतरों के खिलाडी’साठी होकार दिला तर तो या कार्यक्रमाच्या नव्या पर्वात सहभागी होऊ शकतो. ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये तो स्टंटबाजी करताना दिसून येईल. शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकचा मोठा चाहतावर्ग असून ‘बिग बॉस 13’मधील (Bigg Boss) त्यांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या जोडीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे ही जोडगोळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

शिव ठाकरे आणि अब्दू रोजिकने बिग बॉसच्या घराच चांगलाच धुमाकूळ घातला होता. दोघांच्या मैत्रीचं चाहत्यांकडून खूप कौतुक झालं होतं. शिव ठाकरेप्रमाणे अब्दू रोजिकदेखील मंडलीचा भाग होता. पण काही दिवसांपूर्वी अब्दूने मंडली सोडल्याचं म्हटलं जात होता. अब्दू आणि एमसी स्टेन यांच्यात वाद झाला आणि त्यानंतर त्याने मंडळी सोडल्याची शक्यता वर्तवली गेली. पण आता त्यांच्यातील दुरावा कमी झाल्याचं समोर आलं आहे.

अब्दू रोजिक ‘बिग बॉस 16’ मधील सर्वात लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होता. त्याच्या हटके खेळीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाहत्यांचं मनोरंजन केलं. मात्र, 14 जानेवारी 2023 रोजी अब्दूने काही कारणाने या कार्यक्रमामधून एक्झिट घेतली. कार्यक्रमातून बाहेर पडताच त्याने त्याचं ‘प्यार’ हे हिंदी गाणं लाँच केलं. हे गाणं त्याच्या चाहत्यांना खूप आवडलं.

अब्दू रोजिक हा तजाकिस्तानमधील लोकप्रिय गायक आहे. याशिवाय तो एक लोकप्रिय सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. केवळ 3 फूट उंची असलेल्या अब्दूचा दुबईत प्रचंड बोलबाला आहे. अब्दू हे नाव जगभरात लोकप्रिय आहे. ‘बिग बॉस 16’च्या माध्यमातून त्याने भारतीय प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा ‘खतरों के खिलाडी 13’मध्ये धमाका करण्यासाठी तो सज्ज झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये