… म्हणून राणांप्रकरणी न्यायालयानं ठाकरे सरकारला सुनावलं
मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर जाऊन आम्ही हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी म्हंटलं होत. यानंतर शिवसेनिकांनी त्यांना विरोध केला तरीही राणा दाम्पत्य मुंबई मध्ये दाखल झालं. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलं होतं . मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर असा प्रकार करणं गैर आहे असं कारण देत मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केलं. तर काल झालेल्या कोर्टाच्या युक्तिवादामध्ये मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरे सरकारला राणांवरचा राजद्रोहाचा गुन्हा चुकीचा असल्याचं सांगत ठाकरे सरकारला सुनावलं आहे.
तसचं काल राणांना जामीन मिळाला असून त्यांना जामीन देताना न्यायाधीश राहुल रोकडे यांनी निकालात म्हटलं की, राजद्रोहाचा थेट आरोप एखाद्यावर करणं चुकीचं आहे. कारण राणा दाम्पत्याने मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठणाचं जे आंदोलन करणार असल्याचं म्हंटलं होतं परंतु त्यांना मुंबई पोलिसांनी नोटीस दिली असल्यामुळे त्यांनी आपलं आंदोलन माघारी घेतलं होत. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे हे चुकीच असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणी त्यांनी मुंबई पोलिसांना ही सुनावलं आहे.