दादा इज बॅक! आयपीएल मध्ये ‘या’ टीमची घेतली मोठी जबाबदारी; गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली येणार यश?
![दादा इज बॅक! आयपीएल मध्ये 'या' टीमची घेतली मोठी जबाबदारी; गांगुलीच्या नेतृत्त्वाखाली येणार यश? Saurabh](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/03/Saurabh--780x470.jpg)
नवी दिल्ली : (Sourav Ganguli Is Back) बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्समध्ये परतले आहेत. दादाला फ्रेंचायझीचे ‘क्रिकेट संचालक’ बनवण्यात आले आहे. गांगुली याआधीच दिल्ली फ्रँचायझीमध्ये सामील झाला आहे. सध्या सुरू असलेल्या दिल्ली प्रशिक्षण शिबिरातही तो उपस्थित आहे, परंतु अधिकृतपणे आज त्याला जबाबदारी देण्यात आलेली आहे. यापूर्वी आयपीएल 2019 मध्ये सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक होता.
आपल्या या नव्या जबाबदारीबद्दल सौरव गांगुली म्हणाला, ‘मी दिल्ली कॅपिटल्समध्ये परतण्यास उत्सुक आहे. गेल्या काही महिन्यांपासून मी दिल्ली कॅपिटल्सच्या वेगवेगळ्या संघांशी संबंधित आहे. SA20 मध्ये WPL आणि प्रिटोरिया कॅपिटल्समध्ये दिल्ली फ्रँचायझी महिला संघासोबत माझा चांगला प्रवास झाला. आता मी आयपीएलच्या आगामी हंगामाची वाट पाहत आहे.
माझ्या शेवटच्या कार्यकाळात दिल्ली कॅपिटल्सने संघ म्हणून चांगली कामगिरी केली. यावेळीही मला तीच आशा आहे. यावेळी मी खेळाडूंशी आधीच संपर्क साधला आहे आणि मला त्यांना एक मजबूत गट म्हणून बघायचे आहे. पुढील काही महिने आपल्या सर्वांचा वेळ चांगला जाईल अशी आशा आहे.
सौरव गांगुलीच्या मार्गदर्शनाखाली आयपीएल 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने दमदार कामगिरी केली होती. हा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर होता. यानंतर एलिमिनेटर सामन्यात सनरायझर्सचा पराभव करून दिल्लीने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला, जिथे त्यांना CSK कडून पराभवाचा सामना करावा लागला आणि अंतिम फेरी गाठण्यात त्यांना मुकावे लागले.